पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्यात
11 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नॅशनल करिअर सर्व्हिस यांच्यामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित
बेरोजगार उमेदवारासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
हिंगोली येथे दि. 30 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले होते.
या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी,
बारावी, आयटीआय, डिप्लोमा व तसेच पदवीधारक या पात्रतेचे 40 उमेदवार उपस्थित होते. या
40 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यास टाईम्स प्रा.औरंगाबाद,
टाटा मनसा हिंगोली या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment