अकरावी कृषि गणना करण्यासाठी
तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांना प्रशिक्षण
हिंगोली
(जिमाका), दि. 31 : अकरावी कृषी गणनेचे काम
तात्काळ पूर्ण करण्यासाठी जिल्हा व
तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने केंद्र शासनास अकरावी कृषि गणना
2021-2022 साठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेतील वेळापत्रकाप्रमाणे आज येथील जिल्हा
नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी
यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणास
जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
*****
No comments:
Post a Comment