राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण
कार्यक्रमाअंतर्गत
प्रजासत्ताक दिनी तंबाखुमुक्तीची
शपथ घेण्याचे आवाहन
हिंगोली,दि.25 (जिमाका): राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या
उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या
कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता प्रत्येक शाळामध्ये तसेच शासकीय
कार्यालयामध्ये तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.
या वर्षी 26
जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहनानंतर सर्व आरोग्य संस्था,
सर्व शासकीय -निमशासकीय कार्यालये व सर्व शाळा / महाविद्यालय या ठिकाणी तंबाखू, ई-सिगारेटच्या
मुक्तीची शपथ घ्यावयाची असून तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात यावी,
असे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा
रुग्णालय, हिंगोली यांनी आवाहन
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment