18 January, 2023

 

मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी

मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त पर्यायी कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे आदेश

 

 

   हिंगोली (जिमाका), दि. 18 : भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापिठाद्वारा वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम पदाधिकाऱ्यांनी दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्यायआणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) ही नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती हिंगोली जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

******

No comments: