25 January, 2023

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात घेतली शपथ

 


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त

जिल्हा माहिती कार्यालयात घेतली शपथ

 

हिंगोली,दि.25 (जिमाका):  दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत  सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज 25 जानेवारी रोजी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते.

 येथील जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी उपसंपादक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, सर्वसाधारण सहायक कैलास लांडगे, शिपाई चंद्रकांत गोधने आदी उपस्थित होते.

000000

 

No comments: