जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
हिंगोली (जिमाका), दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद
यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीमधील सर्व
अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment