जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली अत्यंत गुंतागुंतीची
शस्त्रक्रिया
हिंगोली (जिमाका), दि. 10 : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात धामणी येथील
31 वर्षीय प्रतिभा खिल्लारे या महिलेच्या गर्भपिशवीत गर्भ न राहता नळीत राहिला होता.
त्यांच्या नाडीचे ठोके अत्यंत कमी झालेले होते. रक्तदाब कमी झालेला होता. त्यांच्या
नळीमध्ये गर्भ फुटल्यामुळे त्यांना खूप रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना दि. 9 जानेवारी
रोजी दाखल करण्यात आले होते.
जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी व अतिरिक्त
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली धामणी येथील 31 वषी्रय महिला प्रतिभा खिल्लारे यांची
प्रकृती अत्यंत चिंताजनक असतानाही अशा अत्यंत गुंतागुंतीच्या कठीण परिस्थितीत स्त्रीरोग
तज्ञ डॉ. फिरदोस अन्सारी व डॉ. वर्षा पवार यांनी लॅप्रोटॉमी नावाची यशस्वी शत्रक्रिया
करुन महिलेला जीवनदान मिळवून दिले आहे. यावेळी भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. रुपाली शिरोडकर,
डॉ.अमोल धुळधुळे शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी काम केले. यावेळी रुग्णाला तीन रक्ताच्या
पिशव्या व दोन प्लेटलेट चढवाव्या लागल्या असल्याची माहिती डॉ. वर्षा पवार यांनी दिली.
या
शस्त्रक्रियेसाठी अधिपरिचारिका आरती मुंढे व जयश्री मोरे तसेच शस्त्रक्रिया सहायक श्री.
थोरात यांनी सहकार्य केले. आज संबंधित रुग्णास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मंगेश टेहरे, डॉ. पांडूरंग राठोड, ज्ञानेश्वर चौधरी
यांनी भेट दिली असता त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णाला जीवनदान मिळवून दिल्याबद्दल
डॉक्टरांचे व त्यांच्या टीमचे आभार मानले.
****
No comments:
Post a Comment