राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या
मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 04 : केंद्र शासनाने 01 जानेवारी, 2023 पासून मोफत
अन्नधान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,
2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दि. 01 जानेवारी ते दि. 31 डिसेंबर, 2023 या
कालावधीत अनुज्ञेय असेलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे. उदा. माहे
नोंव्हेंबर, 2022 किंवा डिसेंबर, 2022 साठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या
अन्नधान्याचे वितरण दि. 01 जानेवारी, 2023 किंवा त्यानंतर करण्यात येत असल्यास ते
अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत वितरीत करावे.
अन्नधान्याच्या मोफत
वितरणामुळे रास्तभाव दुकानदारांना देय असलेले मार्जिन अग्रीम अदा करण्याबाबत
उद्भवणाऱ्या समस्यांबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्रपणे
कळविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या
उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत
रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ योजनेतील पात्र
लाभधारकांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी,
हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment