जडगाव
येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात
बालविवाह
प्रतिबंधक कायद्याची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 25 : औंढा नागनाथ येथील नागनाथ कला,
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ
व वरिष्ठ विभागाचे 25 जानेवारी, 2023 रोजी मौजे जडगाव या ठिकाणी जिल्हा बाल
संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी यशोदीप शिक्षण संस्थेचे संचालक मुरलीधर अण्णा मुळे हे होते. यावेळी
व्यासपीठावर जडगावचे सरपंच बगाटे, उपसरपंच पडोळे, पोलीस
पाटील आनंत सुरुशे, गोपीराज पडोळे, जगदीश पडोळे, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. डी.
ए. पाईकराव यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी
बालविवाह समस्या व अडचणी या विषयावर मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना
बालविवाहाची शपथ देण्यात आली. परिवहन अधिकारी बाणबाकुडे व बाणापुरे यांनी रस्ते
अपघात या विषयावर मार्गदर्शन करुन शपथ दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.
एस.कानवटे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जावयाचे असेल तर समाजाच्या
टिका टिपणीकडे लक्ष देऊ नये, असे
सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. आर. कुंडगीर यांनी केले तर सूत्रसंचालन गौरव पटवे व कोमल
राठोड यांनी केले . आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एन.बी.
पोहकर यांनी मानले. यावेळी बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण , सामाजिक कार्यकर्ता
रामप्रसाद मुडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.जी. जाधव हे
उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरे. डांगे आणि राष्ट्रीय सेवा
योजनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी ,
महाविद्यालयाचे प्राध्यापक
व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment