जिल्ह्यातील उद्योजकांसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 18 : येथील जिल्हा उद्योग केंद्रातर्फे
जिल्ह्यातील उद्योजकांसाठी गुंतवणूक वृध्दी , व्यवसाय सुलभीकरण (EODB) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली एकदिवशीय जिल्हास्तरीय
कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात दि. 17 जानेवारी,
2023 संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.
ए. कादरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रियंका मेहता,
कृष्णा कोतवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकात जिल्हा उद्योग
केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगून सर्व उद्योजकांनी
कार्यशाळेस उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा व जिल्ह्यात गुंतवणूक
करावे, असे आवाहन केले.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक प्रियंका
मेहता यांनी व्यवसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करुन व्यवसाय सुधारण्याबाबत सादरीकरण
केले. तसेच आयटी पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणा विषयी कृष्णा
कोतवाल यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, बीएसएनएल, अन्न व औषधी विभागाशी संबंधित सर्व परवाने एकाच छताखाली मिळण्यासाठी
मैत्री कक्षावर आपली नाव नोंदणी करुन वेगवेगळ्या विभागातील आवश्यक ते परवाने काढण्याबाबत
सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस प्रामुख्याने नांदेडचे
उद्योग अधिकारी जितेंद्र देशमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र
राज्य विद्युत मंडळाचे उप अभियंता अ. जब्बार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे,
इत्यादी अधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एमसीईडीचे
प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले.
******
No comments:
Post a Comment