जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार
दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 06 : येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज पत्रकार दिन
साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमतः मराठी पत्रकार सृष्टीचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री
जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित
करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. हा दिवस दरवर्षी
महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी पत्रकार कल्याण देशमुख, उत्तमराव बलखंडे,
प्रद्युम्न गिरीकर, राकेश भट्ट, शांताबाई मोरे, प्रकाश इंगोले यांनी पत्रकार दिनानिमित्त
मार्गदर्शन करत सर्व पत्रकार बांधवांना
पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दै.गाववालाचे वसुली प्रतिनिधी विठ्ठल
साळवे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक
आशा बंडगर यांनी केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष अपुर्वा, डॉ. प्रल्हाद
शिंदे, कल्याण देशमुख, प्रद्युम्न गिरीकर, राजेश दारव्हेकर, राकेश भट्ट, प्रकाश इंगोले,
दिलीप हळदे, यु.एच.बलखंडे, सचिन कावडे, विलास जोशी, सुधाकर वाढवे, राजेंद्र हलवाई,
शिवाजी थोरात, महिला पत्रकार शांताबाई मोरे,
पल्लवी अटल, राजू गवळी, प्रेस फोटोग्राफर सुनिल पाठक, विजय गुंडेकर, चंद्रकांत वैद्य,
अरुण दिपके, नागरे पाटील यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी चंद्रकांत
कारभारी, आशा बंडगर, परमेश्वर सुडे, चंद्रकांत गोधने आदींची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment