02 January, 2023

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विविध कक्षाची स्थापना

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2023 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचा कालावधी दि. 29 डिसेंबर, 2022 ते दि. 04 फेब्रुवारी, 2023 पर्यंत राहणार आहे. 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 चे  कामकाज सुरळीत व कालमर्यादेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ जितेंद्र पापळकर यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील नियम 159 नुसार विविध कक्षाची स्थापना करुन त्यावर कक्ष प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हास्तरीय समन्वयक व आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून कक्ष प्रमुख म्हणून अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती केली आहे. कायदा व सुव्यवस्था/जिल्हा सुरक्षा नियोजन करणे या समितीवर कक्ष प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची, मतदान कर्मचारी व्यवस्थापन व निवडणूक संचालन कक्षावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे, मतपत्रिका तपासणी कक्षासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, मतदान साहित्य स्वीकृती व वितरण कक्षासाठी विशेष भूसंपादन अधिकारी गोविंद रणवीरकर, स्वीप आणि मूलभूत सोयी सुविधा कक्षासाठी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रशिक्षण कक्षासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गणेश शिंदे, वाहन परवाना व विविध परवाने वितरण कक्ष व वाहतूक आराखड्यानुसार वाहन व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार (महसूल) विठ्ठल परळीकर, आयटी ॲप्लीकेशन सेल ॲन्ड पोल डे रिपोर्टींग सेलसाठी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अब्दूल बारी, नोडल अधिकारी म्हणून सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार, स्ट्राँग रुम तयार करणे व बॅलेट बॉक्सेस व्यवस्थापना कक्षासाठी तहसीलदार नवनाथ वगवाड, मतदार यांच्या कार्य प्रती तयार करण्यासाठी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीराम पाचपुते, अवैध दारु वाटपास प्रतिबंध कक्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले, उमेदवार खर्च आणि जप्त रकमा व मुद्देमाल तपासणी कक्षासाठी कोषागार अधिकारी झुंजारे, कोविड-19 आरोग्य कक्षासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, मा. निवडणूक निरीक्षक यांच्या व्यवस्थापन कक्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोत्रे, जिल्हा माध्यम नियंत्रण कक्षासाठी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, मतदार मदत कक्ष/तक्रार निवारण कक्षासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कक्षनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कक्ष अधिकाऱ्यांनी  जबाबदारीने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

             

**** 

No comments: