10 July, 2026

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाइन नामांकन सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 10 : महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी पात्र मुला-मुलींचे ऑनलाइन नामांकन सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली येथील संयुक्त सचिव यांच्या दि. 18 मे 2026 रोजीच्या पत्रानुसार प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी सर्व नामांकने व शिफारशी 31 जुलैपर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

इच्छुकांनी व संबंधित शाळा, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी पात्र मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांचे नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन सादर करावे. सदर नामांकन https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर करता येणार असून, अधिकाधिक पात्र मुलांना या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकित करण्यासाठी सर्व संबंधितांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*******

No comments: