हिंगोली (जिमाका), दि. 10 : भारत
सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'मेरा युवा
भारत (माय भारत)' उपक्रमाअंतर्गत युवा नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत जिल्हा युवा अधिकारी
प्रणित सांगवीकर यांनी मेरा युवा भारत संकेतस्थळ, उपक्रमाची उद्दिष्टे, युवकांसाठी
उपलब्ध स्वयंसेवा संधी, अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या
युवा नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी युवा नोंदणी अभियानासाठी
तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या
प्राचार्यांचा सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त युवकांची मेरा युवा भारत संकेतस्थळावर
नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या
शैक्षणिक शाखेनुसार उपलब्ध स्वयंसेवा, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख संधींची माहिती
देण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, शासकीय तंत्रनिकेतनचे जे. व्ही. वानखेडे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पवन वासनिक, प्रा. डॉ. किशोर इंगोले, डॉ. सचिन हाटकर, डॉ. सोपान खरात, स्काऊट आणि गाईड्सच्या जिल्हा संघटक माधुरी दळवी तसेच डॉ. विजय निलावार उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment