27 July, 2026

सेनगाव तालुक्यातील युवक-युवतींसाठी आरी वर्क व फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण

 

* ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. २७ : जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली यांच्या वतीने सेनगाव तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतींसाठी आरी वर्क व फॅशन डिझाईनिंग या विषयावरील मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असावा तसेच त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) व बँक पासबुकची प्रत यांसह अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी.

नाव नोंदणीची अंतिम मुदत ३० जुलै २०२६ असून, इच्छुकांनी मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक विकास उंडाळ (मो. ८४१२०८९२७२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली येथेही संपर्क साधता येईल.

या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए. एस. कदम तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.

******

No comments: