साहित्यरत्न
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानातून युवकांनी प्रेरणा घ्यावी – पंडित
अवचार
हिंगोली
(जिमाका), दि. 31 : जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या
मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या
जन्मदिवसानिमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन
आयोजित करण्यात आले आहे.
या ग्रंथ प्रदर्शनाचे
उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित अवचार यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य
क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या
साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या
लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक
अर्धापुरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव
सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, शंभोनाथ
दुभळकर, डिगंबर झुंजारे तसेच ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ग्रंथ प्रदर्शनामध्ये
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठी भाषेतील विविध
विषयांवरील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे प्रदर्शन जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले
आहे.
नागरिक, विद्यार्थी, युवक,
साहित्यप्रेमी तसेच वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा आणि
अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृतीला चालना द्यावी,
असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
*******

No comments:
Post a Comment