12 July, 2026

हिंगोली येथे 15 जुलै रोजी भव्य रोजगार मेळावा

 


हिंगोली, दि.१२(जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार  (दि.१५) रोजी हिंगोली येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्रातील २० पेक्षा अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, विविध पदांसाठी २००० पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यात दहावी, बारावी पास/नापास, आय.टी.आय., डिप्लोमा, इंजिनिअरिंग, सर्व शाखेतील पदवीधर, सीएनसी ऑपरेटर, सिपेट तसेच इतर पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे असून, निवड झालेल्या उमेदवारांना साधारणतः १५ ते ₹३० हजार रुपये मासिक वेतन/विद्यावेतन मिळण्याची संधी आहे. कंपनीमार्फत जेवण, चहा, नाश्ता, बस सुविधा तसेच ८ तास ड्युटी व ओव्हरटाईमची सुविधा लागू राहील.

हा रोजगार मेळावा कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदानाच्या बाजूला, हिंगोली येथे दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी. इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 9765535444, 9673668844 आणि 9607965622 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

*****

No comments: