17 July, 2026

जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धांचे 23 व 24 जुलै रोजी आयोजन

 


·         15 व 17 वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्पर्धा; शाळांनी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2026-27 या वर्षासाठी जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 15 वर्षांखालील मुले व 17 वर्षांखालील मुली तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या गटासाठी होणार असून, जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी केले आहे.

15 वर्षांखालील मुले व 17 वर्षांखालील मुलींच्या गटातील स्पर्धा दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता तालुका क्रीडा संकुल, पोलीस स्टेशनसमोर, वसमत येथे होणार आहेत. तर 17 वर्षांखालील मुलांच्या गटातील स्पर्धा दि. 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता तालुका क्रीडा संकुल, वसमत येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्पर्धेसाठी 15 वर्षांखालील गटातील खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2012 किंवा त्यानंतरचा, तर 17 वर्षांखालील गटातील खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आपल्या संघाची प्रवेशिका स्पर्धेपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी. तसेच स्पर्धेच्या दिवशी खेळाडूंनी व संघ व्यवस्थापकांनी फोटोयुक्त ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे.

अधिक माहितीसाठी सचिव, हिंगोली जिल्हा सॉकर असोसिएशन अजहर पटेल (मो. 9175767778) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली (मो. 9561760878) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

No comments: