राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या
'संवाद-2025' योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न
हिंगोली (जिमाका),
दि. 17 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र
राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने 'संवाद -2025' योजनेअंतर्गत मार्गदर्शन
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आदिवासी मुलींचे
शासकीय वसतिगृह क्रमांक 2, तसेच आदिवासी मुलांचे वसतिगृह -1 हिंगोली येथे आयोजित या
कार्यक्रमात वंचित, अनुसूचित, आदिवासी व विमुक्त भटक्या जमातींना न्याय सुलभ करून देण्यासाठी
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये कायदेविषयक
जनजागृती करून त्यांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीचे सचिव बी. एम. काळे यांनी राष्ट्रीय विधी सेवा
प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना
मोफत कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच
गरजू नागरिकांनी मदतीसाठी 15100 या हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात
आले.
या कार्यक्रमास
सहाय्यक प्रकल्प अधिकारी रमेश भडके, गृहपाल श्री. दुबळकर, अच्युत बचाटे, तसेच आदिवासी
वसतिगृहातील कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य केले.
*****


No comments:
Post a Comment