ज्येष्ठ नागरिकांसाठी हिवरखेडा येथे मोफत आरोग्य शिबिर
संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 17
: सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, हिंगोली तसेच एकता बहुउद्देशीय महिला मंडळ, लातूर यांच्या संयुक्त
विद्यमाने सेनगाव तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथे ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत मोफत
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात 60 वर्षांवरील ज्येष्ठ
नागरिकांच्या आरोग्य तपासणीस प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण रक्त तपासणी
(सीबीसी), रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, हृदय विद्युत आलेख (ईसीजी), वजन
मोजणी, अस्थमा, डोळे तसेच कान-नाक-घसा आदी विविध तपासण्या करून आवश्यक वैद्यकीय
मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरासाठी तालुका आरोग्य
अधिकारी, सेनगाव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरा यांचे विशेष सहकार्य लाभले.
हिवरखेडा व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा
लाभ घेतला.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.
विजय रहाटे, परिचारिका प्रीती धबडगे, एमपीडब्ल्यू बाळू काकडे, आशा सेविका रेणुका
गायकवाड, अंगणवाडी सेविका आर. एन. जाधव, पोलीस पाटील रूपाली राऊत, सरपंच पूजा मस्के,
उपसरपंच चंद्रभागा फुफाटे, ग्रामपंचायत सदस्य मीना निरगुडे यांच्यासह ग्रामस्थ
उपस्थित होते.
शिबिराचे नियोजन व यशस्वी आयोजन
करण्यासाठी जिल्हा समन्वयक वैभव कांबळे व दत्तराज मगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या
उद्देशाने अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे
यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment