हिंगोली, दि. २३ (जिमाका) : छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री. नागेश्वराचे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती त्यांनी विभागीय आयुक्तांना दिली.
विकासकामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी कामांची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्णत्व यावर भर देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.
*****




No comments:
Post a Comment