हिंगोलीत बुधवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
• 250 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि कै. बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे बुधवार, (दि. 22) रोजी सकाळी 10 वाजता कै. बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सेवा क्षेत्रातील नामांकित 13 आस्थापनांचा सहभाग असून त्यांच्याकडून 250 रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये कपीश्वर शुगर्स अॅण्ड केमिकल्स लि., आर्मस इंडिया प्रा. लि., क्वेस कॉर्प लि., गोविंद कार्स, जया ह्युंदाई, जय गजानन ट्रॅक्टर्स, परिवार सुपर बाजार, भारतीय जीवन विमा निगम, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा. लि., भारत फायनान्स, खंडेलवाल ज्वेलर्स, एस. के. सोलार पॉवर सोल्युशन आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स या आस्थापनांचा समावेश आहे. इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविका, पदवी तसेच पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार असून विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा www.ncs.gov.in या संकेतस्थळांवर रोजगार नोंदणी करून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा. तसेच दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व बायोडाटासह कै. बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी ०२४५६-२२४५७४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment