·
सनियंत्रण समिती व जिल्हास्तरीय
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ टास्कफोर्स बैठकीत विविध योजनांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 24 :
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करून त्यांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी करावी. तसेच महिला व
बालकांना आवश्यक सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित
यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी
दिले.
महिला
व बालविकास विभागाच्या सनियंत्रण समितीची तसेच जिल्हास्तरीय ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेंतर्गत टास्कफोर्सची बैठक आज
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार
पडली.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी संतोष दरपलवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, विधी सल्लागार, सहाय्यक पोलिस
निरीक्षक, केंद्र प्रशासक, समुपदेशक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
या बैठकीमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजना, वन स्टॉप सेंटर तसेच महिला समुपदेशन केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात
आला. केंद्र पुरस्कृत विविध योजनांची जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी अधिक प्रभावीपणे
करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच हिंगोली येथे वन स्टॉप सेंटरच्या स्वतंत्र इमारतीच्या
बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश
देण्यात आले.
******

No comments:
Post a Comment