* हक्क संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत 30 जुलै रोजी कार्यशाळा
हिंगोली (जिमाका), दि. 29 : समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन उद्या गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती, रोजगाराच्या संधी तसेच स्वावलंबनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय सहभागींसाठी विशेष आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी व्यक्ती तसेच तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्ती व विद्यार्थ्यांनी या उपयुक्त कार्यक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment