07 September, 2026

हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण 9 सप्टेंबरला निश्चित होणार*

*हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण 9 सप्टेंबरला निश्चित होणार*


हिंगोली, दि. 7 (जिमाका) : जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या दि. 31 ऑगस्ट 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदे सन 2025-2030 या कालावधीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला (नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसह) प्रवर्गासाठी आरक्षित करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत.


या अनुषंगाने अधिसूचनेच्या अनुसूची-2 नुसार हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे निश्चित संख्येप्रमाणे आरक्षण थेट/चिठ्ठी सोडत पद्धतीने सर्वांसमक्ष निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी बुधवार, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे.


हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सर्व नागरिकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, हिंगोली यांनी केले आहे.

No comments: