03 September, 2026

रोजगार महाकुंभाअंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी रोजगार मेळावे 29 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी प्लेसमेंट ड्राईव्ह; नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे

 रोजगार महाकुंभाअंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी रोजगार मेळावे


29 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी प्लेसमेंट ड्राईव्ह; नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे


हिंगोली, दि. 3 सप्टेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत राज्यव्यापी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 29 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे.


हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी सहा ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली; वराहमिहिर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमनुरी; शककर्ता शालीवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ; बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत; तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव आणि कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर यांचा समावेश आहे.


10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी


या रोजगार महाकुंभामध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी तसेच पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR कोडद्वारे किंवा https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवरून नावनोंदणी करावी. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्रांसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा.


रोजगार महाकुंभाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय, हिंगोली येथे 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी केले आहे.


No comments: