हिंगोली (जिमाका), दि. 22 सप्टेंबर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद २०२६ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोलीच्या वतीने श्री गजराज बाल गणेश मंडळ, पोस्ट ऑफिससमोर, हिंगोली येथे नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाकडून देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात पुरवठा निरीक्षक जान्हवी पानसे यांनी मार्गदर्शन केले.
लोकसंवाद २०२६ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
यावेळी गणराज बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष विशाल बडजाते, अनुप झंवर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
00000

No comments:
Post a Comment