हिंगोली, दि. १६ (जिमाका) : बसमतनगर येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेंतर्गत संस्थेच्या व्यवस्थापन समितीमार्फत ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक’ व्यवसायासाठी शिल्प निदेशकाचे एक पद भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे पद ११ महिन्यांच्या सेवा कराराच्या आधारावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास ₹१००/- बाँडवर विहित नमुन्यात सेवा करारनामा करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकीतील बी.व्होक./पदवी आणि संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असावा.
किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम तसेच संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव असावा.
तसेच ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक’ व्यवसायातील एनटीसी/एनएसी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारही पात्र आहेत. उमेदवाराकडे डीजीटीअंतर्गत एनसीआयसी किंवा डीजीटीचे संबंधित नियमित/आरपीएल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या तत्सम व्यवसायाची पदवी/पदविका तसेच शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील अधिक माहितीसाठी www.dgt.gov.in या संकेतस्थळाचा संदर्भ घ्यावा.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज, बायोडाटा, शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या मूळ प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह संस्थेच्या अध्यक्ष तथा सचिव, संस्था व्यवस्थापन समिती, स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बसमतनगर, जिल्हा हिंगोली येथे २० सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित मुदतीत सादर करावा.
विभागाकडून विहित मानधनावर नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास सदर नियुक्ती रद्द होईल. तसेच रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे उमेदवाराची नोंदणी असणे आवश्यक आहे. पद भरणे, न भरणे अथवा पदांची संख्या वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार संस्था व्यवस्थापन समितीने राखून ठेवला आहे, याबाबत अधिक व सविस्तर माहितीसाठी संस्थेचे सदस्य सचिव, अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment