हिंगोली, दिनांक 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आकर्षक रांगोळीने सजविण्यात आला होता. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
या ध्वज वंदन कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, तहसीलदार श्रीकांत भूजबळ यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***


No comments:
Post a Comment