17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान तालुक्यात विविध स्वच्छता उपक्रम
हिंगोली, दि. २४ सप्टेंबर:-‘स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेनुसार पंचायत समिती, हिंगोली येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून ‘स्वच्छता ही सेवा 2026’ अभियानास प्रारंभ केला. दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हिंगोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवणे, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छ व निरोगी गावांच्या निर्मितीसाठी नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायत समिती हिंगोली येथे झालेल्या श्रमदान उपक्रमात पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान यशस्वी करण्याचा संकल्प केला.
No comments:
Post a Comment