24 September, 2026

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित

 पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित

हिंगोली, दि. 24 (जिमाका) : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे संपूर्ण विभागात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसंदर्भात निवडणूक विभागाकडून अधिसूचना प्राप्त झाल्याने हिंगोली जिल्ह्यात दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी नियोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पुढील सहा ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन नियोजित करण्यात आले होते.

1. हिंगोली – शासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली (ता. जि. हिंगोली)

2. कळमनुरी – वराहमिहीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कळमनुरी

3. तोंडापूर – कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर (ता. कळमनुरी)

4. औंढा नागनाथ – शककर्ता शालिवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), औंढा नागनाथ

5. सेनगाव – तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव (ता. सेनगाव)

6. वसमत – बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत (ता. वसमत)

या ठिकाणी दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी होणारा रोजगार महाकुंभ आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे. रोजगार महाकुंभाची पुढील तारीख व वेळ याबाबतची माहिती यथावकाश कळविण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, महामंडळे, शासकीय व निमशासकीय कार्यालये, उद्योजक तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: