23 September, 2026

लोकसंवादमध्ये शेतकऱ्यांना एआय महाविस्तार ॲपच्या वापराबाबत मार्गदर्शन कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी AI महाविस्तार ॲपचा वापर करण्याचे आवाहन

 



                                                                                                                                                                                                                                                                                                    

     हिंगोली (जिमाका), दि. 23 सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद २०२६ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोलीच्यावतीने श्री रुद्राक्ष गणेश मंडळ, शिवनेरी चौक, अकोला बायपास, हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना एआय विस्तार ॲपच्या वापराबाबत कृषी विभागाच्या वतीने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सहाय्यक कृषी अधिकारी अनंत मस्के यांनी एआय विस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. या ॲपवर कीड व रोग नियंत्रण, रिअल-टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, शासकीय योजनांची माहिती तसेच कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान व त्यासाठीची पात्रता याबाबत माहिती उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


तसेच मृदा आरोग्य व खत व्यवस्थापनाबाबतही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते. माती परीक्षणाच्या आधारे पिकांसाठी आवश्यक खतांची योग्य मात्रा कशी वापरावी, याबाबत माहिती मिळत असल्याने अनावश्यक व चुकीच्या खतांचा वापर टाळून उत्पादन खर्चात बचत करण्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले. एआय विस्तार ॲप डाउनलोड करण्याची प्रक्रिया व त्याचा वापर याबाबतही सहाय्यक कृषी अधिकारी अनंत मस्के यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.


यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी विजय पवार, जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील, मानसी राऊत, श्री रुद्राक्ष गणेश मंडळाचे आयोजक दिलीप माने, अध्यक्ष सतीश घोरपडे, सदस्य सुमित घिके, गोविंद सारस्वत, शिवाजी गायकवाड, सतीश लोणकर, सुनील काळे, संतोष चंद्रवंशी, रवींद्र जाधव, विनायक मधीलवार, आनंद नागरे, दयानंद मुधोळ, आकाश काळे, आशुतोष वेरूळकर आदी उपस्थित होते.

00000

No comments: