24 September, 2026

एचआयव्हीविषयी योग्य माहिती देण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - प्राचार्य हिंगमिरे


▶️ जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकसंवाद कार्यक्रम 

हिंगोली, दि. २४ (जिमाका) : किशोरवयीन विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य, लैंगिक आरोग्य आणि एचआयव्हीविषयी योग्य माहिती देण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव हिंगमिरे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘लोकसंवाद’ कार्यक्रम शासकीय नर्सिंग महाविद्यालय, हिंगोली येथे पार पडला. यानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण व एचआयव्ही, एड्सविषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

 या प्रशिक्षणात जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही, एड्सविषयी जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी बजावावयाच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्र.जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके, प्राचार्य उद्धव हिंगमिरे, कुलदीप कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

No comments: