17 September, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते* *जिल्हा परिषद कार्यालयात ध्वजवंदन*

हिंगोली, ( दि. १७ ) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र. ) समृध्दी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण ) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) मंजुश्री कल्लेवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) विपुन भगत, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांच्यासह इतर विभाग प्रमुख व जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.     
             000

No comments: