24 September, 2026

स्पर्धा परीक्षा केंद्रात ‘लोकसंवाद’ कार्यक्रम



एचआयव्ही प्रतिबंध व सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

हिंगोली, दि. २४ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र, हिंगोली येथे विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही प्रतिबंध, सुरक्षितता आणि जनजागृती विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकू ज्ञानेश्वर चौधरी यांनी एचआयव्ही संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षित जीवनशैली तसेच एचआयव्हीबाबतचे गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एचआयव्ही बाधित व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांना सामाजिक आधार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी एचआयव्हीविषयक अचूक माहिती आत्मसात करून ती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवावी. एचआयव्हीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी युवकांनी जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अमजद शेख यांच्यासह प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके,  विद्यार्थी उपस्थित होते.

No comments: