हिंगोली, दि. 13 सप्टेंबर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी व तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायीक जिल्हा हिंगोली अंतर्गत येणा-या न्यायालयामध्ये शनिवार १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणात एकुण तब्बल १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची तडजोडी आधारे रक्कम ठरविण्यात आली व प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर, तालुका विधी सेवा समिती हिंगोली यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. माने-गाडेकर, जिल्हा न्यायाधीश-२ डी.जी. ढोबळे, सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर एस.जी. दुबाले, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती डि. व्ही. भंडारी यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम केले. दिवाणी न्यायाधीश व स्तर तथा समन्वयक व्ही.एम. मानखैर, तालुका विधी सेवा समिती, हिंगोली पी.जी. महाळंकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर श्रीमती. एस. डी. जायभार दिवाणी न्यायाधीश क. स्तर, कळमनुरी हे उपस्थित होते. अॅड. एम.जे. पठाडे, अॅड. आर.बी. बांगर, अॅड. ए.ए. गायकवाड, अॅड. ए.पी. खरटमोल यांनी पॅनल विधीज्ञ म्हणून काम केले.
या लोकअदालतीमध्ये सर्वांत मोठ्या रक्कमेचा धनादेश ६५ लाख रुपये लिबर्टी जनरल विमा कंपनीच्या अधिकारी श्रीमती श्रध्दा किनारे यांनी संबंधित पक्षकारांना तडजोडीअंती सुपुर्द केला. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबीत असलेली १९ हजार ७९९ प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती व फायनान्स कंपनी यांची वाद दाखलपुर्व ११ हजार ४३५ प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यामध्ये सदरील लोकअदालतीमध्ये प्रलंबित ३६५ व वाद दाखलपुर्व प्रकरणे ३१३ निकाली काढण्यात आली.
तसेच यावेळी जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य अॅड. पि.के. शिरसाठ, अॅड. एन.एस. घुगे, अॅड. एस. के. शिरसाठ, अॅड. एम.एस. साकळे, कोषाध्यक्ष अॅड. विलास घोंगडे पाटील, सचिव अॅड. मिलीद कांबळे, विमा कंपनीचे विधीज्ञ अॅड. अजय व्यास, अॅड. नरवाडे, अॅड. एस. जी. वाघमारे, तसेच वकील संघाचे विधीज्ञ अॅड. एस. बी. गडदे, अॅड. महेश आहेर, अॅड. परतवार, अॅड. सुरज शिंदे, अॅड. बि.डी. टेकाळे, अॅड. रवि जाधव, अॅड. महारूद्र जाधव, अॅड. आडे, अॅड. दायमा, अॅड, रवि पठाडे, अॅड. स्वप्नील इंगळे, अॅड. हनुमान वामन, अॅड. मुदसर, अॅड. अर्धापुरकर, अॅड. निलेश पुरी, अॅड. पृथ्वीराज आखरे, अॅड. के. नरोटे उपस्थीत होते.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायीक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेले एकुण चार पॅनल करण्यात आले होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी सदर लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी कर्तव्य पार पाडले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांनी पुढील १२ डिसेंबर, २०२६ रोजीच्या आयोजीत राष्ट्रीय लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवुन निकाली काढावीत, असे आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment