⏺️ असुरक्षित इमारतींच्या बळकटीकरणासाठी प्रभावी पर्याय
v
⏺️पांगरा
शिंदे प्राथमिक शाळेचे रेट्रोफिटिंग पूर्ण
हिंगोली,
दिनांक २४ (जिमाका) : भूकंपाच्या धक्क्यांपासून जुन्या व असुरक्षित इमारतींचे संरक्षण
करण्यासाठी सीएसआयआर-केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान (CSIR-CBRI), रुडकी यांनी विकसित
केलेल्या ‘STABLE’ (Steel Twin Lintel Band) तंत्रज्ञानाचा हिंगोली जिल्ह्यात यशस्वी
पथदर्शी प्रयोग करण्यात आला आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेचे
या तंत्रज्ञानाद्वारे रेट्रोफिटिंग पूर्ण करण्यात आले आहे. या प्रयोगामुळे महाराष्ट्रातील
असुरक्षित इमारतींच्या बळकटीकरणासाठी प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जुन्या व असुरक्षित इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे STABLE तंत्रज्ञानाने बळकटीकरण करण्यात आले.
भिंतींना स्टील पट्ट्यांचा मजबूत आधार
STABLE तंत्रज्ञानामध्ये
इमारतीच्या भिंतींवर लिंटेल पातळीवर आतील व बाहेरील बाजूंनी स्टीलच्या पट्ट्या बसविल्या
जातात. या पट्ट्या थ्रू-बोल्टच्या साहाय्याने एकमेकांना जोडल्या जातात. त्यामुळे इमारतीच्या
भिंतींना एकसंध आणि मजबूत आधार मिळतो. भूकंपाच्या वेळी भिंतींची परस्पर जोडणी मजबूत
राहण्यास यामुळे मदत होते.
अभियंत्यांना विशेष प्रशिक्षण
या तंत्रज्ञानाचा
प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी CSIR-CBRI च्या तज्ज्ञांकडून हिंगोलीतील स्थानिक अभियंत्यांना
विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये जुन्या इमारतींचे तांत्रिक मूल्यांकन आणि रेट्रोफिटिंगच्या
पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
असे झाले शाळेचे बळकटीकरण
पांगरा शिंदे
येथील शाळेच्या इमारतीची प्रथम पाहणी करून लिंटेल पातळी निश्चित करण्यात आली. आवश्यक
त्या ठिकाणी प्लास्टर काढण्यात आले. त्यानंतर भिंतींमध्ये छिद्रे पाडून आतील व बाहेरील
बाजूंना स्टीलच्या पट्ट्या बसविण्यात आल्या.
थ्रू-बोल्ट,
वॉशर्स आणि डबल नट्सच्या साहाय्याने या पट्ट्या घट्ट जोडण्यात आल्या. त्यानंतर सिमेंट
ग्राउटिंग करून रिकाम्या जागा भरून काढण्यात आल्या. इमारतीच्या कोपऱ्यांवर स्टील अँगल
बसवून वेल्डिंग करण्यात आले. त्यामुळे दोन दिशांच्या भिंतींची जोडणी अधिक मजबूत झाली.
शेवटी गंजरोधक कोटिंग व रंगरंगोटी करण्यात आली.
कमी खर्चात, कमी वेळेत बळकटीकरण
No comments:
Post a Comment