05 July, 2020

हिंगोली शहरात पाच दिवस संचारबंदी


       हिंगोली,दि.05:  राज्‍य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने  करोना विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हिंगोली शहरात 2 जूनच्या आदेशान्वये जिवानावश्यक वस्तूंची दूकाने सुरु करण्यात आली होती. परंतू जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या अहवालानुसार हिंगोली शहरातील तालाबकट्टा, गांधी चौक आणि रिसाला बाजार या भागात कोरेाना बाधीत रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हिंगोली नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती/वाहन) व सर्व आस्थापनास 5 ते 10 जुलै, 2020 या कालावधीत बंदी करण्यात आले.  

संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजारात, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरतांना आढळून आल्यास त्याचे विरोधात भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग  प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधीतावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

****

1 comment:

Pavan said...

वसमत बंद करा 14 दिवसांसाठी