ऑनलाईन निसर्ग शाळेचे
पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
हिंगोली, (जिमाका) दि. 13 : येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड
यांच्या हस्ते वृक्षाला पुष्पहार अर्पण करुन निसर्ग शाळेचे उद्घाटन केले. यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निसर्गप्रेमी साहित्यिक मारुती चित्तमपल्ली हे ऑनलाईन
सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चित्रपट अभिनेता भाऊ शिंदे, प्रसिध्द साहित्यिक
प्रा. इंद्रजित भालेराव, मुख्यमंत्री सचिवालयाचे सिध्देश्वर मोकाशे यांची ऑनलाईन
उपस्थिती होती.
फळ लागलेले वृक्ष जसे झुकते तसे
वृक्षाप्रमाणे जीवनात नम्रतेने वागायला शिकले पाहिजे. पुस्तकाबरोबरच निसर्गाचे
ज्ञान अवगत करण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. ही निसर्ग शाळा
सर्वसामान्य मुलांपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करावे. छंद हा शिक्षणाशी
जोडला पाहिजे. छंदाबरोबरच ज्ञान मिळाले पाहिजे. जीवन वायू म्हणजे ऑक्सिजन
झाडापासून मिळतो. लहानपासून मुलावंर
संस्कार होत असल्यामुळे त्यांना कर्तत्व सिध्द करता येणार आहे. ही निसर्ग शाळा
सौदी अरेबियापर्यंत पोहोचली आहे. अशीच प्रगती सुरु ठेवण्यासाठी काही मदत लागल्यास
ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी
दिले.
निसर्गाची शाळा मुलाचे भविष्य घडवत
नाही तर मुलांना भविष्यासाठी घडविते. अल्पावधीतच निसर्गाची शाळा भारतातील
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, छत्तीसगडसह सौदी अरेबियात जाऊन पोहोचली
आहे. या शाळेत 1300 विद्यार्थी निसर्गाचे मोफत धडे घेत आहेत. विद्यार्थी, पालकांची
निसर्गाविषयी आवड व काळाची गरज लक्षात घेऊन निसर्ग शाळा ॲपची निर्मिती करण्यात आली
असल्याची माहिती अण्णा जगताप यांनी
प्रास्ताविकात दिली.
यावेळी विद्यार्थी, निसर्ग शाळेचे
पदाधिकारी उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment