12 August, 2021

 



उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व्हेंटीलेटर्सचे लोकार्पण

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 :            राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोर्पोरेट सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यासाठी 8 व्हेंटीलेटर्स उपलब्ध करुन दिले आहेत. या व्हेंटीलेटर्सचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.

कोरोना किंवा इतर कारणांमुळे कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यासाठी व्हेंटीलेटर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे व्हेंटीलेटर्स जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

****

No comments: