03 August, 2021

                             जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 557 मि.मी. पावसाची नोंद 

हिंगोली, (जिमाका) दि. 03 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 1.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी  557 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 70.04 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 03 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसात दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आहेत.

हिंगोली  2.70 (544.80) मि.मी., कळमनुरी 1.80 (557) मि.मी., सेनगांव 3.70 (508.20) मि.मी., वसमत 0.30 (559.80) मि.मी., औंढा नागनाथ 0.10 (649.40) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी  557 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

 **** 

No comments: