04 August, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज, तर 09 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 04 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही. तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 03 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 999 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 601 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 09 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 389 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

No comments: