दिव्यांगासाठी
मोफत प्रशिक्षणाचे आयोजन
हिंगोली,
(जिमाका) दि. 12 : शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण
केंद्र व वसतीगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम
महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची शासन मान्यता आहे. या संस्थेला
अखिल भारतीय स्तरावरील एफआयसीसीआय-1999 प्राप्त झाला आहे.
सन
2021-22 या चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्टीफिकेट
इन कॉम्प्यूटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस या संगणक कोर्स व मोटार ॲन्ड आमेंचररिवायडींग,
सबमर्सिबल पंप सिंगल फेज या इलेक्ट्रीक कोर्ससाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. संगणक
कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास च इलेक्ट्रीक कोर्ससाठी शैक्षणिक
पात्रता किमान नववी पास असणे आवश्यक आहे.
वरील
दोन्ही कोर्ससाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष या दरम्यान असलेल्या दिव्यांग मुलांनाच
प्रवेश दिला जातो. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा आहे. या प्रशिक्षण
कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत परिपूर्ण संगणक
कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमूख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व
इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगार
व्यवसाय बीज भांडवल योजना आदी सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेश
अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी
रोड, म्हेत्रेमळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिन-416410 या पत्यावर
पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत.
प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला , दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम
अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती
जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ
समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे.
माफक
जागा असल्याने ग्रामीण व शहरी भागातील गरजू दिव्यांगानी या संधीचा लाभ घेण्यासाठी
त्वरित संपर्क साधावे, असे आवाहन अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व
वसतीगृह, मिरज ता.मिरज जि. सांगली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment