03 August, 2021

 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 6 ऑगस्ट रोजी हिंगोली दौऱ्यावर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 03 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्राम गृह, नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. 10.30 वाजता शासकीय विश्राम गृह हिंगोली येथे आगमन व राखीव. 11.00 वाजता शासकीय विश्राम गृह हिंगोली येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. 11.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व 11.05 ते दु. 1.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.00 ते 2.00 वा. शासकीय विश्राम गृह, हिंगोली येथे भोजन व राखीव. 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण.

*****

 

No comments: