कौशल्य
स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर
हिंगोली,
(जिमाका) दि. 12 : दरवर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होतात. त्यासाठी जिल्हा,
विभागीय आणि राज्यस्तरावर परीक्षा होऊन निवड झालेल्या उमेदवारांची देशपातळीवरील
स्पर्धेसाठी निवड केली जाते. या स्पर्धेसाठी महास्वयंम पोर्टलवर सन 2019-2020
दरम्यान नोंदणी करण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे स्पर्धा कार्यक्रम स्थगित
ठेवण्यात आले होते. आता शासनाने दि. 17 व 18 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हास्तरावरील
स्पर्धा, दि. 23 व 24 ऑगस्ट, 2021 रोजी विभागीय स्तरावरील स्पर्धा आणि 3 ते 5
सप्टेंबर, 2021 दरम्यान राज्य स्तरावरील स्पर्धेचा कार्यक्रम घोषित केला आहे. यापूर्वी ज्या ईच्छूक उमेदवारांनी कौशल्य
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेली नाही त्यांना देखील दि. 15 ऑगस्ट, 2021
पर्यंत महास्वयंम पोर्टलवरील लिंकद्वारे नोंदणी करता येणार आहे. सर्व नोंदणी
केलेल्या उमेदवारांच्या स्पर्धा घोषित कार्यक्रमानुसार होणार आहेत.
हिंगोली
जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहायक आयुक्त,
कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाशी अथवा आयटीआयच्या प्राचार्यांना त्वरित संपर्क
साधावा. हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता, हिंगोली कार्यालयाचे प्र.सु. रुद्रकंठवार (मो.
क्र. 8390961874) व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण , हिंगोलीचे प्राचार्य एस. पी. भगत
(मो. क्र. 9767765298) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी
स्पर्धेत सहभागी व्हावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे .
******
No comments:
Post a Comment