महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू
हिंगोली, (जिमाका) दि. 30 : महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त
पूर्व परीक्षा-2020 हिंगोली मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 4 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी
11.00 ते 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.
या कालावधीत जिल्ह्यात कायदा व
सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी 1) आदर्श महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली
भाग-अ, 2) आदर्श महाविद्यालय, अकोला रोड,
हिंगोली भाग-ब, 3) शासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली, 4) सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल,
शास्त्रीनगर, हिंगोली, 5) विद्यानिकेतन इंग्लीश स्कूल, बियाणीनगर, हिंगोली, 6)
जिल्हा परिषद कन्या शाळा, हिंगोली, 7) एबीएम इंग्लीश स्कूल, लिंबाळा, हिंगोली, 8)
जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, हिंगोली, 9) संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे
महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली, 10) पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकोला रोड, हिंगोली,
11) कै.बाबूराव पाटील कला महाविद्यालय, गारमाळ, परिसर, हिंगोली, 12) अनुसया
विद्यामंदीर खटकाळी बायपास, हिंगोली, 13) शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, 14)
गुलामनबी आझाद उर्दू हायस्कूल, कळमनुरी, 15) महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय,
कळमनुरी, 16) कै.शिवरामजी मोघे सैनिक स्कूल असोलवाडी रोड, कळमनुरी, 17) कै.शंकरराव
सातव अ.महाविद्यालय, कळमनुरी, 18) सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय,
हिंगोली या 18 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार असून या परिक्षा केंद्रावर 4 हजार
488 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया
संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. वरील सर्व परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 ते
दुपारी 2.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.
परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व
परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर
कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर
परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश
परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी
यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय
कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्तकामी नेमणूक
केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार
नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन,
मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.
या नियमांचे उल्लघन केल्यास
संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने
आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी
आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment