संत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळाकडे
अनुदान
योजना व बीजभांडवल योजनेसाठी कर्ज प्रस्ताव
दाखल करण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 03 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्या)
जिल्हा कार्यालय हिंगोली साठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत
20 व बिजभांडवल योजनेअंतर्गत 16 उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत. या दोन्ही योजना राष्ट्रीयीकृत
बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजाअंतर्गत
असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्जप्रस्ताव
मागविण्यात येत आहेत.
या समाजातील लाभ घेऊ इच्छिणारा अर्जदार हा या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने
महामंडळाच्या नियमाप्रमाणे जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडून घेतलेला असावा), अर्जदाराच्या
कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा (तहसिलदार यांच्याकडून घेतलेला असावा), नुकत्याच
काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती जोडाव्या, अर्जदाराच्या शैक्षणिक दाखला,
राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स प्रती, व्यवसायाचे
दरपत्रक (कोटेशन, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा
आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं.8), लाईट
बिल, टॅक्स पावती, बिज भांडवल योजनेसाठी प्रकल्प
अहवाल, वाहनासाठी लायसन्स, परवाने बॅच, व्यवसायाचे
ग्रामपंचायत, नगर परिषद यांचे ना हारकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र
तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र ही आवश्यक कागदपत्रे स्वयंसाक्षांकित
करुन घोषणापत्र देण्यात यावे.
वरील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज तीन प्रतीत जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार,
हिंगोली येथे दि. 4 ऑगस्ट, 2021 पासून दि.
9 सप्टेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.15) स्वत: अर्जदाराने
मूळ कागदपवत्रांसह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे
स्विकारण्यात येणार नाहीत.
याचा
हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील
चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक, युवतींनी तसेच होतकरु
गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,
असे आवाहन अरुण सि. राऊत, जिल्हा व्यवस्थापक, हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment