उच्च व तंत्रशिक्षण
मंत्री उदय सामंत यांचा हिंगोली दौरा
हिंगोली, (जिमाका) दि. 10 : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे गुरुवार, दि. 12
ऑगस्ट, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा
कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे .
गुरुवार, दि. 12 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता नांदेड येथून
मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे
आगमन व राखीव . 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी.
दुपारी 1.30 ते 2.00 वाजता राखीव. 2.00 वाजता हिंगोली येथील शासकीय
तंत्रनिकेतनमध्ये शासकीय तंत्रनिकेतन आढावा व राष्ट्रीय सेवा योजना-कोविड योध्दयांच्या
सत्कार समारंभास उपस्थिती . 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे
मा.ना. श्री. आदित्य ठाकरे , मंत्री (पर्यावरण) यांच्या पुढाकाराने देण्यात
येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. 3.00 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय, हिंगोली येथे पत्रकार परिषद . 3.30 वाजता हिंगोली येथून मोटारीने
परभणीक्रडे प्रयाण .
*****
No comments:
Post a Comment