10 August, 2021

 

पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी

पारधी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 10 : पारधी विकास योजना सन 2018-2019 व सन 2020-2021 अंतर्गत पारधी जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मालवाहू ॲपे ॲटो व युवती महिलासाठी हळद व मिरची कांडप मशीन तसेच बेरोजगार युवक, युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे उपलब्ध आहेत. इच्छूक लाभार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयास संपर्क साधून परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज दि. 25 ऑगस्ट, 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रकल्पअधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.

पारधी समाजाच्या बेरोजगार युवकांना मालवाहू ॲपे टेणे ही योजना वैयक्तीक सुवरुपाची  असून सन 2018-2019 च्या लाभार्थ्यासाठी शासनाचा सहभाग 2 लक्ष रुपये व उर्वरित रक्कम लाभार्थ्यांची असणार आहे. तर सन 2019-2020 च्या लाभार्थ्यासाठी शासनाचा सहभाग 2.15 लक्ष रुपये व उर्वरित रक्कम लाभार्थ्यांची असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीन चाकी वाहनचालक परवाना, किमान वयोमर्यादा 45 वर्ष, किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे) , आधार कार्ड, या योजनेचा लाभ कुटुंबातील व्यक्तीने यापूर्वी न घेतल्याचे प्रमाणपत्र, नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट छायाचित्रे व रेशन कार्ड इत्यादी कागदपत्राची आवश्यकता आहे.

पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांना हळद, मिरची कांडप ही योजना वैयक्तीक स्वरुपाची असून सन 2019-2020 साठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 45 वर्ष, सक्षम अधिकाऱ्याची दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांचे रहिवाशी प्रमाणपत्र, तहसीलदारांचे सन 2021-21 चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, या योजनेचा लाभ कुटुंबातील व्यक्तींने यापूर्वी न घेतल्याचे प्रमाणपत्र, नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट छायाचित्रे, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

पारधी समाजाच्या युवक, युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याची योजना वैयक्तीक स्वरुपाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे, किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांचे रहिवाशी प्रमाणपत्र, तहसीलदारांचे सन 2020-21 वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट छायाचित्रे व रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.  

वरील तिन्ही योजनांपैकी एकाच योजनेसाठी अर्ज करावे. जर दोन्ही योजनेसाठी अर्ज केला असल्यास कमी लाभाच्या योजनेचा अर्ज रद्द करण्याचे, बदल करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी राखून ठेवलेले आहेत.

*******

No comments: