प्रमाणित बियाणे
वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिचंन सुविधा साधने यासाठी शेतकऱ्यांनी
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
हिंगोली,
दि. 26 (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा
अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे
वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व
सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी सन 2021-22 साठी
इच्छूक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी
गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित
कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी
दि. 30 ऑगस्ट, 2021 ते दि. 10 सप्टेंबर, 2021 या कालावधीत नोंदणी करावी. विहित
मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाणार आहे .
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य
कार्यक्रम खालील नमूद जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.
गहू - सोलापूर, बीड, नागपूर. कडधान्य (हरभरा) -राज्यातील सर्व जिल्हे. भरडधान्य
(मका) - नाशिक, धुळे, जळगाव,अहमदनगर,
सांगली,औरंगाबाद, जालना. पौष्टिक तृणधान्य - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे,
सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,
हिंगोली, बुलढाणा, अकोला ,वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. गळीतधान्य - सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम,चंद्रपूर.
बियाणे वितरण : वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाच्या आतील
वाणास 25 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रुपये प्रती किलो, संकरीत मका 95
रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाच्या आतील वाणास 30 रुपये
प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रती किलो, करडई बियाण्यासाठी 40 रुपये प्रती किलो, गहू बियाण्यासाठी 10
वर्षाच्या आतील वाणास 20 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 10 रुपये प्रती
किलो प्रमाणे बियाणे वितरण करण्यात येणार आहे. एकूण किंमतीच्या 50 टक्के
मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित
बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिके : पीक प्रात्यक्षिकासाठी एका
शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या
निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या
प्रकारानुसार 2 हजार रुपये ते 4 हजार रुपये प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर
अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या
सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे
अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन
लॉटरी पध्दतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे
अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment